Tuesday, 28 June 2022

Glimpses of the Chitrasamvad ( Art Talk Show) : Some of the Memorable Episodes

Chitrsamvad

is an art talk show started by Dr.Nitn Hadap and Uday Bandivdekar in

2011

This is an effort toward sensitizing common people about contemporary art practices and encouraging young artists of the city and surrounding area by giving them a platform for presenting their art practice.

( This visual literacy program is fully supported by Maharashtra Cultural Center, Pune, at an early stage by Madhuri Purandare, and till the date by Pramod Kale, Pune)


Poster of a first Talkshow by Dr. Nitin Hadap and Uday Bandivadekar on Contemporary art practice in Baroda: 2011, April

Poster of the Talk Show on Sir J.J. School of art tradition,2014, July 27
Performance by Dr.Nitin Hadap, Pramod Riswadkar and Vishnu Abhyankar during Chitrsamvad (Art Talk) on Sir J.J. School of art tradition ( Photograph)


Poster of Art talk by Dr. Shreekant Pradhan, Pune on his Miniature painting art practice, 2014, Nov 23


Poster of the talk show of visual art practice and photographs by Uday Bandivadekar, Pune 2015, Dec 27
Poster of the Art Talk by Artist Rajaram Hole, Mumbai of his Europe tour,2016, Jan 24



Image of the talk by artist Rajaram hole, Mumbai at Chitrasamvad MCC art talk

Poster of Art talk by Dr. Vikram Kulkarni,Pune on Vharad Folk Art tradition, 2017,June 17

Renowned contemporary artist Atul Dodia has presented his work on the 50th episode of the Chtrasmavad Art Talk Show.


Poster of art talk by Artist Atul Dodia,Mumbai on his art practice, 2017, Nov.15
Poster of art talk by artist Jatin Das, New Delhi, 2018, Feb 26
Poster of a Art talk by Manasi Sagara, Nasik on her nude art practice,2018,Nov 25

Poster of Art Talk by Parag Tandel, Mumbai on How to enter in Contemporary art world,2019,March 25

, Poster Art Talk by artist kedar Namdas,Pune on his recent works,2021,March 28


Visual Art related projects of MCC,Pune:

Article by Mr. Pramod Kale, V.P. MCC,Pune ( After his Facebook page)

कलादालनानं अगदी सुरुवातीपासून अंगिकारलेली काही धोरणं, अव्यावसायिकता (म्हणजे इतर art galleries प्रमाणे काही ‘कमिशन’ घेऊन चित्रविक्रीसाठी इ. प्रयत्न न करणं), दृश्यकलाविषयक सामाजिक जाणिवा अधिक वाढवणं, दृश्यकला रसग्रहणाची लोकांची नजर अधिक घडविणं वगैरे, आणि या कलादालनाच्या कामकाजात सहभागी असलेल्या काल उल्लेख केलेल्या व्यक्तींचा या सर्व कामाकडे पहाण्याचा नेक दृष्टिकोन यामुळे कलादालनाला सुरुवातीपासूनच या क्षेत्रातील कित्येक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व्यक्तींचा पाठींबा, स्नेह, मार्गदर्शन आणि सहभाग लाभला. या नावांची यादी पाहिली की खरोखर थक्क व्हायला होतं आणि कृतज्ञताही भरून येते. सुधीर पटवर्धन, अरुण खोपकर, संजीव खांडेकर, एस. एच. रझा, प्रभाकर कोलते, वसंत आबाजी डहाके, संदेश भंडारे, अतुल डोडिया, कृष्णम्माचारी बोस, दि. पु. चित्रे, जतीन दास, गीव्ह पटेल, दिलीप रानडे, सुहास बहूळकर, समर नखाते आणि कितीक! या सर्वांच्या अकृत्रिम स्नेहभावाचा आमच्या धोरणांच्या पूर्तीसाठी निश्चितच लाभ झाला. इथली कित्येक महत्वाची कला प्रदर्शनं यांपैकी काहींच्या सहभागा आणि सहकार्याविना होऊच शकली नसती. दृश्यकलांविषयक समाज जागृतीचा आणि लोकशिक्षणाचा कार्यभागही या सर्वांमुळे अधिक परिणामकारक आणि प्रभावी झाला.
सुरुवातीच्या काळात माधुरी पुरंदरे यांनी दृश्यकला रसग्रहणाच्या काही कार्यशाळा आयोजित केल्या. यांमध्ये विविध कलांचे आंतरसंबन्ध, दृश्यकलांमधील काही जागतिक कलाकारांच्या कार्याची ओळख, या कलांमधील विविध प्रवाह (‘इझम्स’) अशा विविध विषयांवर व्याख्यानं, चर्चा इ. घडल्या.
यानंतर समाजातील काही इतर घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करता येतील का यावर विचार करत असताना 'चित्रबोध' या संकल्पनेचा उदय झाला. चित्रबोध म्हणजे पूर्वनियोजित गटासाठी दृश्यकलांची ओळख करून देणारी विशिष्ट कालावधीची कार्यशाळा. अशा एकूण तीन कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या-
'चित्रबोध १' (३१ मे ते ३ जून, २०१२) : ही कार्यशाळा प्राथमिक शाळांमधील शिक्षक व पालक यांच्यासाठी होती. कल्पना अशी की, त्यांनी इथे मिळवलेली माहिती, सजगता त्यांच्या विद्यार्थी/पाल्यांपर्यंत पोहोचवावी. या कार्यशाळेच्या आयोजनात पालकनीती परिवार आणि वनस्थळी या संस्थांची आणि संजीवनी कुलकर्णी यांची महत्वाची मदत झाली. या कार्यशाळेत सर्वश्री सुधीर पटवर्धन, दिलीप रानडे, सचिन कुंडलकर व वसंत आबाजी डहाके या विषयतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यांच्याशिवाय ऋचा कुलकर्णी, नितीन हडप, वैशाली ओक अशी सुदर्शन कलादालनाचं काम पाहणारी दुसरी फळीही यात सहभागी होती.
'चित्रबोध २' (२६ ते २९ सप्टेंबर २०१३) : ही कार्यशाळा विशेषतः कला विद्यार्थ्यांसाठी होती, पण इतर जिज्ञासूंनाही प्रवेश होता. नृत्य, नाट्य, ललित लेखन, संगीत आणि दृश्यकला यांतील परस्पर आंतरसंबंध स्पष्ट करणं हा या कार्यशाळेचा हेतू होता. सर्वश्री समर नखाते, शकुंतला कुळकर्णी, पुष्पा भावे, चैतन्य कुंटे, राहुल रानडे, शमा भाटे, राजीव नाईक व कृष्णम्माचारी बोस या विषयतज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
'चित्रबोध ३' ( सप्टेंबर - ऑक्टोबर २०१८ ) : ही कार्यशाळा अनेक दृष्टींनी विशेष होती. वर उल्लेखलेल्या कालावधीतील दर रविवारी सकाळी १० ते १ अशी वेळ होती. कार्यशाळा औपचारिक कलाशिक्षण पूर्ण केलेल्यांसाठीच फक्त होती. ज्येष्ठ कलाकार कुमार वैद्य यांनी या कालावधीत Conceptual art आणि तत्संबंधी काही आधुनिक कलाप्रवाह या एकाच विषयावर सात व्याख्यानं दिली. व्याख्यानांमध्ये दृक् श्राव्य माध्यमांचा सढळ वापर करून वैद्य यांनी विद्यार्थ्यांना या वेगळ्या कलाविष्काराची सांगोपांग ओळख करून दिली.
या व्यतिरिक्त आणखी दोन महत्वाचे दीर्घकालीन उपक्रम हाती घेण्यात आले. पहिला म्हणजे विविध कलाकार, त्यांच्या कलाकृती आणि विविध कलाप्रवाह यांसंबंधी चित्रपट, लघुपट दाखवणं! दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सुदर्शन रंगमंच येथे हे माहितीपट प्रदर्शित केले जायचे. चित्रकला, शिल्पकला, मांडणीशिल्प, उपयोजित कला, वास्तुरचना भारतीय लघुचित्रं; पॉल क्ली, व्हॅन गॉग, मायकेलेंजेलो, पिकासो, डेव्हिड, मोने, दा व्हिंची अशा अक्षरशः शेकडो विषयांवरील लघुपट सातत्यानं दहा वर्षे प्रदर्शित केले गेले. याशिवाय संगीत, नृत्य, नाट्य आणि दृश्यकला या विषयांशी संबंधित पूर्ण लांबीच्या कथाचित्रपटांचे एकेका आठवड्याचे महोत्सवही आयोजित केले गेले. या उपक्रमामुळे पुण्यातील विविध कलामहाविद्यालयांतील अनेक विद्यार्थी आणि अध्यापक सुदर्शनशी कायमचे जोडले गेले. हे विविध लघुपट आणि चित्रपट उपलब्ध करून देण्याचं महत्वाचे काम अभिजित रणदिवे आणि समर नखाते यांनी केलं.
दुसरा महत्वाचा उपक्रम म्हणजे ‘चित्रसंवाद’. नवोदित कलाकारांना आपलं काम लोकांपुढे मांडावं, त्याविषयी काही संवाद, प्रसंगी वादही घडावे अशी इच्छा असते. या उपक्रमाद्वारे हीच गोष्ट साधली जाते. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सुदर्शन रंगमंच येथे हे अजूनही घडतं. आजवर सुमारे ६५ ‘चित्रसंवाद’ सादर झाले आहेत. या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी डॉ. नितीन हडप सांभाळतात.
याशिवाय दृश्यकलाक्षेत्रातील अनेक मातब्बर व्यक्तींची व्याख्यानं आणि प्रात्यक्षिकं सुदर्शनतर्फे आयोजित केली जातात. आजवर एस.एच.रझा, दि.पु.चित्रे, वसंत आबाजी डहाके, सुधीर पटवर्धन, दिलीप रानडे, जतीन दास, बोस, प्रभाकर कोलते, अरुण खोपकर, अतुल डोडिया प्रभृती अनेक विचारवन्त कलाकारांची सप्रयोग व्याख्यानं आयोजित करण्यात आली. या नामवंतांनी वेळोवेळी या प्रांतातील नवोदितांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना मार्गदर्शनही केलं.
यापुढे आणखी दोन अत्यन्त अभिनव उपक्रम हाती घेण्याचा आमचा मानस आहे. पैकी एक म्हणजे पुण्याच्या दृश्यकलाकारांच्या कलाकृतींचं एक कायमस्वरूपी कला संग्रहालय उभारणं! पुण्यातील आणि पुण्यात सुरुवात करून आता बाहेर स्थायिक झालेल्या सुमारे पन्नास कलाकारांनी त्यांची कामं यासाठी विनामूल्य देण्याचं मान्य केलं आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या टिळक रस्त्यावरच्या वास्तूत लवकरच या कामाला सुरुवात होईल. दुसरा उपक्रम म्हणजे ‘कम्युनिटी स्टुडिओ’. कित्येक कलाकारांना काम करण्यासाठी स्वतःचा स्टुडिओ नसतो. ही गरज ओळखून सुमारे आठ स्टुडिओज एकत्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे. याच ठिकाणी रेसिडेन्सीही घेता येतील.
तर अशी ही ‘सुदर्शन कलादालन’ ची वाटचाल! इतर कोणतंही कलादालनं करत नसतील अशी ही विविध कामं कोणत्याही अर्थव्यवहाराशिवाय, केवळ कलेच्या आस्थेपोटी इथं होत असल्याने या कलादालनाला कलाकार आणि रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान लाभलं आहे!
Text by Pramod Kale


No comments:

Post a Comment